मतदान व मतमोजणीच्या 48 तासापासून मद्यविक्रिस मनाई

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135(सी) नुसार मनाई करण्यात आली आहे. हे दिवस “कोरडा दिवस’ म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.

निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भर वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधित मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येते. तसेच मतदानापूर्वीचे 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्यविक्री करण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचे उल्लंघन करणाछयांचे परवाने रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघामध्ये एकूण 4 टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. 11 एप्रिल रोजी 7 मतदारसंघासाठी, 18 एप्रिल – 10 मतदारसंघासाठी, 23 एप्रिल -14 मतदारसंघासाठी आणि 29 एप्रिल – 17 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)