आळंदीत वर्षभरात केवळ सहाच जोडप्यांची विवाह नोंदणी 

जनजागृतीचा अभाव: डॉ. डी. आर. जाधव

आळंदी: येथील ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू करून एक वर्षे झाले, मात्र त्यास प्रतिसासदच मिळत नसल्याचे उघड झाले आहे. येथे गेल्या वर्षभरात अवघ्या सहा जोडप्यांचीच विवाह नोंदणी केली असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. आर. जाधव यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीर्थक्षेत्र आळंदी येथे प्रथम आळंदी नगरपरिषदेत विवाह नोंदणी केली जात होती, मात्र, त्याचे वर्गीकरण शासनाने आळंदी ग्रामीण रूग्णालयाकडे एक वर्षापूर्वी केले आहे. त्यामुळे सुरूवातीला तर इकडे-तिकडे करण्यातच सहा महिन्यांचा अवधी निघून गेला. पालिकेत गेले की, रूग्णालयात जा अन्‌ रूग्णालयात आले की, पालिकेत जा अशी परिस्थिती असल्याने नोंदणीधारकांनी याकडे कानाडोळा केला होता. दरम्यापन, मागील जून महिन्यापासून आळंदी ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी कार्यालय सुरू केले आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारीही नेमण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरात अवघ्या सहा जणांनीच विवाह नोंदणी सुरू केली आहे. वास्तविक, आळंदीची लोकसंख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे विवाह संख्या जास्त आहे. मात्र, नागरिकांमध्ये विवाह नोंदणीबाबत जागृतता कमी असल्याचे जाणवते.

आळंदी पालिकेचे नगरसेवक सचिन गिलबिले यांनी नुकतेच त्यांच्या चुलत बहिणीच्या विवाहाची नोंदणी केली. विवाह नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद पाहून त्यांनी जनजागृतीसाठी प्रसिद्धी पत्रक आणि स्थानिक मंगल कार्यालयाच्या माध्यमातून कार्यालय चालकांची बैठक घेऊन त्यांच्यामार्फतही जनजागृती करण्यासाठी लवकरच मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींची बैठक लावू, असे सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)