अळगिरी यांच्या पुत्राची 40 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – द्रमुकमधून हकालपट्टी झालेले नेते एम.के. अळगिरी यांच्या पुत्रची तब्बल 40 कोटी रुपयंची स्थावर मालमत्ता सक्‍तवसुली संचलनालयाने आज प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून तब्यात घेतली. या मालमत्तेमध्ये 25 जंगम आणि स्थावर मालमतांचा समावेश आहे.

ग्रानईटच्या बेकायदेशीर खाण उद्योगातील मदुराई, चेन्नई येथील इमारती आणि ऑलम्पस ग्रानाईट प्रा.लि. कंपनीचे 40.34 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी “ईडी’ने मनी लॉंडरिंग विरोधी कायद्याखाली जप्त केल्या आहेत. या कंपनीच्या समभाग धारकांपैकी एस. नागारजन आणि अळगिरी धयानिधी यांच्यासह अन्य आरोपींनी मिळून ग्रानाईटची बेकायदेशीर खाण उद्योग सुरू केल्यामुळे सरकारचे नुकसन झाल्याचा दावा “ईडी’ने केला आहे. या प्रकरणी कंपनीविरोधात आणि अन्य आरोपींच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)