अल-कायदा युरोपात 9/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार : ब्रिटिश संरक्षण मंत्री

लंडन (ब्रिटन): दहशतवादी गट अल-कायदा युरोपात 9/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची शक्‍यता आहे. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध ट्‌विन टॉवर्सवरील हल्ल्याप्रमाणेच अल कायदा युरोप खंडात विमान हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ब्रिटिश संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांनी दिली आहे.

काही वर्षे शांत असलेला अल कायदा दहशतवादी गट पुन्हा संघटित होऊन कार्यरत होत असल्याचे स्पष्ट करून सावधगिरीचा इशारा देताना बेन वॉलेस यांनी सांगितले की अल कायदा विमानतळ आणि विमानांवर जोरदार हल्ला करण्याची शक्‍यता आहे. अल कायदाने जेट विमाने पाडण्याचे तंत्र विकसित केल्याची माहिती ब्रिटिश हेरखात्याने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2011 मध्ये पाकिस्तानच्या एबोटाबाद येथे अल कायदा नेता ओसामा बिन लादेनला मारण्यात आले होते. त्यानंतर अल कायद्याच्या हालचाली थंडावल्या होत्या. मात्र अल कायदा आता सीरिया, अफगाणिस्तान, येमेन, लिबिया आणि मध्यपूर्वेतील देशांत पुन्हा डोके वर काढत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)