अल कायदाच्या म्होरक्‍याने दिली भारताला धमकी

नवी दिल्ली – दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्‍या अल जवाहिरीने काश्‍मीरवरून पुन्हा एकदा गरळ ओकत काश्‍मीरमध्ये दहशतवाद भडकावणारा संदेश जारी केला आहे. त्याने काश्‍मीरला विसरू नका या नावाने संदेश देत केवळ भारताला इशारा देत भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थन केले आहे.

अल कायदाच्या मीडिया शाखेने जारी केलेल्या संदेशात दहशतवादी मुसाचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. काश्‍मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागचा अल जवाहिरीचा हेतू असल्याचे स्पष्ट होत आहे. यावेळी त्याने दहशतवाद्यांना जिहादी असे संबोधले आहे. तसेच काश्‍मीरमध्ये लढणाऱ्या जिहादींनी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या तावडीतून मुक्त झाले पाहिजे असे म्हटले आहे. तसेच शारीया कायद्यानुसार त्यांनी आपली धोरणे तयार केली पाहिजे, असेही त्याने संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, जवाहिरीने ठार करण्यात आलेल्या झाकिर मुसाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. काश्‍मीरमधील लढाई ही कोणताही वेगळा संघर्ष नसून संपूर्ण मुस्लीम समुदायासाठी तो जिहादचाच एक भाग आहे. आपले दहशतवादी मशीद, बाजारपेठा आणि मुस्लीम बांधव एकत्र येतात अशा काश्‍मीरमधील ठिकाणांना निशाणा बनवत नाही, असेही त्याने संदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)