अक्षयच्या मिशन मंगलचा टिझर रिलिज

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट “मिशन मंगल’चा टीझर रिलीज झाला आहे. यात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा यांसह सर्व कलाकार आपल्याला टिझरमध्ये दिसून येत आहेत. हा टिझर अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. टिझर शेअर करत अक्षयने लिहिले आहे की, “एक देश, एक स्वप्न, एक इतिहास’. हा चित्रपट म्हणजे भारताच्या मंगळ अभियानावर आधारित सत्य घटना आहे.

टीझरमध्ये आपण पाहू शकतो की, कशाप्रकारे एक रॉकेट स्पेसमध्ये पाठवले जाते आहे. यासाठी संशोधकांची संपूर्ण टीम कश्‍या प्रकारे काम करत आहे. टीझरच्या सुरूवातीलाच आपल्याला सॅटेलाईटची झलक पाहायला मिळते. यानंतर सॅटेलाईन लॉन्च करताना दाखवले गेले आहे. चित्रपटातील संपूर्ण टीम टिझरमध्ये एक-एक करून दाखवली गेलीय. टिझरच्या अखेरीस लिहिलेले आहे “आकाशाची सीमा नाही.’

यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले होते, ज्यात सॅटेलाईटसोबत चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट दाखवली गेली होती. पोस्टर शेअर करत अक्षय कुमारने लिहिले होते, “अशा अंडरडॉग्जची कथा, जे भारताला मंगळ ग्रहापर्यंत घेऊन गेले. शक्ती, साहस, आणि कधीही हार न मानणाऱ्यांची कथा. मिशन मंगल, मंगळ ग्रहावर भारताच्या अंतराळ अभियानाची सत्य घटना. 15 ऑगस्ट 2019 ला आपल्यासाठी येतेय.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)