जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी “फोर्ब्स’ मासिकाने जाहीर केली आहे. या यादीत अक्षय कुमारने धमाकेदार एन्ट्री केली असून या यादीत अक्षय हा एकमेव भारतीय अभिनेता आहे. या यादीत अक्षय 33व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात अक्षयने 65 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 444 कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत अक्षय कुमारने जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यासारख्या अव्वल हॉलीवूड कलाकारांनाही मागे टाकले आहे.
अक्षय कुमारच्या हाती सध्या “हाऊसफुल 4′, “मिशन मंगल’, “सूर्यवंशी’, “गुड न्यूज’, “लक्ष्मी बॉम्ब’ हे चित्रपट आहेत. चित्रपटांशिवाय अक्षय सध्या 20 वेगवेगळ्या ब्रॅंडच्या जाहिरातीसुद्धा करत आहे.
“फोर्ब्स’च्या या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट पहिल्या स्थानी आहे. गेल्या वर्षभरात तिने तब्बल 1264 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे टेलर स्विफ्ट 2016पासून या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तिच्यानंतर मॉडेल काइली जेनर दुसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट, अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लियोन मेसी आणि ब्रिटीश गायक एड शीरन हे अनुक्रमे तिस-या, चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहे.