बनावट व्हिडीओवर भडकला अक्षय

अक्षय कुमारने सायबर क्राईम विभागाकडे एक तक्रार दाखल केली आहे. आपला एक व्हिडीओ एडिट करून युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. या एडिटेड व्हिडीओमुळे आपली प्रतिमा मलीन झाली असल्याचे अक्षय कुमारने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ एका इव्हेंटमध्ये झालेल्या प्रश्‍नोत्तराचा आहे. या प्रश्‍नोत्तरादरम्यान अक्षयला एका दुसऱ्याच अभिनेत्रीबद्दल प्रश्‍न विचारला गेला होता. पण हा व्हिडीओ एडिट करण्यात आला होता. त्यामध्ये या अभिनेत्रीच्या जागेवर तनुश्री दत्ताचे नाव घुसवण्यात आले होते.

एकिकडे तनुश्री आणि नानामधील वाद कायद्याच्या चौकटीत आला असताना बॉलिवूडमध्ये या दोघांच्याही बाजूंनी पब्लिकने उतरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याचीच चिन्हे आहेत. हा प्रकार नक्की काय आहे, हे पोलिसांकडून तपासले जात आहे. मूळ व्हिडीओ आणि युट्युबवर उपलब्ध असलेल्या व्हिडीओची पडताळणी केली जात आहे. हा बनावट व्हिडीओ कोणी अपलोड केला याची तपासणीही सायबर क्राईमच्यावतीने केली जात आहे. अक्षय कुमारने त्याच्या “हाऊसफुल्ल 4’चे शुटिंग संपवले आहे आणि तो मुंबईला परत आला आहे. त्याच्या नंतर तो “कॉफी विथ करण’मध्येही सहभागी झाला होता. त्याच्या बहुचर्चित “2.0’चा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)