अक्षय कुमारच्या ‘केसरी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित 

बाॅलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा आगामी ‘केसरी’ सिनेमा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार जबरदस्त अॅक्शन करताना दिसून येत आहे. या ट्रेलरची सुरुवात ‘एक गोरे ने मुझसे कहा था कि तुम गुलाम हो, ह‍िंदुस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते हैं. आज जवाब देने का वक्त आ गया है’ या दमदार डायलॉगपासून होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अक्षय कुमारसह या सिनेमात अभिनेत्री म्हणून परिणीती चोप्रा मुख्य भूमिका साकारत आहे. केसरी या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट १८९७ मधील सारागढीच्या युद्धावर आधारित असून, यामध्ये २१ शीख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांना ठार केले होते. इतिहासामध्ये सर्वात अवघड युद्धांपैकी हे एक युद्ध मानले जाते. २१ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिनेमा बाॅक्स आॅफिसवर चांगलीच कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)