#Video : अक्षय कुमारच्या ‘केसरी’ सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे – बाॅलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने आपल्या आगामी केसरी या सिनेमा ची झलक सोशल माध्यमाव्दारे प्रदर्शित केली आहे. सिनेमाची झलक काही वेळातच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानंतर आता प्रेक्षकांना हा सिनेमा प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हा सिनेमा बाॅक्स आॅफिसवर चांगलीच कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नुकताच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले.’केसरी’ चित्रपट 1897 साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांना खूप भावते आहे. या पोस्टरमध्ये अक्षयने पगडी परिधान केली असून हातात तलवार पाहायला मिळते आहे.

सिनेमांचा ट्रेलर हा 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.अक्षय कुमारने नुकतेच या चित्रपटाची पहिली झलकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

अक्षय कुमारसह या सिनेमात अभिनेत्री म्हणून परिणीती चोप्रा भूमिका साकारत आहे. केसरी या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)