तृतीयपंथीय भूताच्या रोलमध्ये अक्षय कुमार

वेगळे रोल साकारून आपल्या प्रेक्षकांना आश्‍चर्याचे धक्के देणाऱ्या ऍक्‍टर्समध्ये अक्षय कुमारचे नाव अव्वल आहे. काही दिवसांपूर्वी त्याने रजनीकांत यांच्याबरोबर “2.0’मध्ये चक्क अतिमानवीय शक्‍ती असलेल्या व्हिलनचा रोल साकारला आहे. त्यापूर्वी ऍक्‍शन हिरो म्हणून तो बॉलिवूडमध्ये प्रस्थापित आहेच. आता एका तृतीयपंथीयाच्या भूताच्या रोलमध्ये अक्षय प्रेक्षकांसमोर येणार आहे. दक्षिणेकडील “कंचना’ या सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या “लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अक्षयला हा किन्नरचा रोल साकारायचा आहे.

अक्षय या रोलमध्ये कसा दिसेल, असा सगळ्यांनाच प्रश्‍न पडला आहे. पण “लक्ष्मी बॉम्ब’चा फर्स्ट लुक रिलीज झाल्यावर त्याचा हा चेहरा मोहरा कसा असेल, याची झलक सगळ्यांना बघायला मिळाली. स्वतः अक्षय कुमारनेच या पोस्टरला आपल्या ट्‌विटर हॅन्डलवरून पोस्ट केले आहे. डोळ्यात घातलेले काजळ आणि चेहऱ्यावरील बदललेल्या हावभावांमुळे अक्षय या हिजड्याच्या रोलमध्ये किती फिट बसतो आहे, हे सगळ्यांनाच समजले.

“लक्ष्मी बॉम्ब’चे डायरेक्‍शन राघव लॉरेन्स डायरेक्‍ट करणार आहे. मूळ दक्षिणात्य “कंचना’मध्ये राघवनी एक महत्वाचा रोल केला होता. आता या हिंदी रिमेक असलेल्या “लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अमिताभ बच्चनही असणार आहेत, असे समजते आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)