केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला अक्षय कुमार

बाॅलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री मदत निधीमध्ये आर्थिक सहाय्य केले आहे. सामाजिक समस्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी योगदान देण्यासाठी नेहमी पुढे येणाऱ्या अक्षय कुमार याने केरळचे मुख्यमंत्री यांच्याकडे केरळच्या पूरग्रस्तांना मदत म्हणून धनादेश (चेक) दिला आहे.

तसेच चित्रपट निर्माता प्रियदर्शन यांनीसुध्दा शनिवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मदत म्हणून चेक दिला आहे. त्यांनी यासंदर्भातील एक फोटो ट्विट करत लोकांना एकजूट होऊन राज्याला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

प्रियदर्शन यांनी लिहले आहे की, मी आणि अक्षय कुमार याने केरळसाठी  मुख्यमंत्री मदत निधीमध्ये अर्थसहाय्य केले आहे. चला, माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन केरळ राज्याला मदत करू या. केरळसाठी एकत्र येऊ या.

अक्षय कुमार ने यासंदर्भात सोशल मीडियावर काही माहिती दिली नाही आहे. पण केरळ राज्यासाठी मदत करा असे एक ट्विट रीट्विट केले आहे. ज्यामध्ये केरळसाठी कशाप्रकारे मदत करू शकता यांची माहिती दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)