सौदी अरेबियात प्रदर्शित होणारा  ‘हा’ पहिलाच बाॅलीवूड चित्रपट

अक्षय कुमार याचा १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित झालेला ‘गोल्ड’ हा चित्रपट धीम्या गतीने बिजनेस करत असला तरी, या चित्रपटाने बाॅक्स आॅफिस मध्ये चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने कमाईसोबतच एक ‘इतिहास’ रचला आहे.

अक्षय आणि मौनी राॅ स्टारर चित्रपट ‘गोल्ड’ हा सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. सौदी अरेबियात प्रदर्शित होणार हा बाॅलीबूड मधील पहिला चित्रपट आहे. याबाबतची माहिती स्वत: अक्षय कुमार याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.

दरम्यान ‘हाॅकी’ खेळावर आधारित असलेला ‘गोल्ड’ हा चित्रपट देशातच नाही तर विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सिनेरसिकांच्या पंसतीस उतरला आहे. देशात ‘गोल्ड’ या चित्रपटाने १०० कोटीचा आकडा पार केला आहे. तसेच जागतिक स्तरावर चित्रपट १५० कोटी रूपयेपेक्षा जास्त कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)