अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ झाला लीक, कमाईवर परिणाम होण्याची शक्यता !

भारतीय स्वातंत्र्यदिनी बुधवारी प्रदर्शित झालेला गोल्ड हा चित्रपट लीक झाला आहे. बाॅलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे.  ‘टाॅरेंट’ यूजर हा चित्रपट फ्री मध्ये डाउनलोड करून पाहू शकतात. यामुळे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार आहे असे म्हटले जात आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवसानंतरच चित्रपटास पायरसीचे ग्रहण लागले आहे. अनेक वेबसाईटवर हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे दर्शकांना चित्रपट डाउनलोड करण्याचा किंवा फ्री मध्ये चित्रपट पाहण्याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे.

वेबसाईटवर हा चित्रपट खराब प्रिंटमध्ये उपलब्ध आहे तर काही वेबसाईटवर हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये असल्याचे समजते आहे. या चित्रपटास बाॅक्स आॅफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या सुरूवातीला २५ कोटी रूपये कमावले होते मात्र दुसऱ्यादिवशी कमाईमध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे.हा चित्रपट लीक झाल्याने चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)