‘या’ दिवशी अक्षय-जॉन-प्रभासचे चित्रपट सिल्वर स्क्रीनवर भिडणार

येत्या 15 ऑगस्टला सिनेरसिकांसाठी एकाच दिवशी तीन बडे चित्रपट भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’, जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हे तीन बिग बजेट चित्रपट रिलीज होणार असून, या तिन्ही चित्रपटांमध्ये जोरदार टक्कर असेल. मात्र, एकाच दिवशी तीन बडे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाच्या कमाईवर देखील चांगलाच परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

“एकाच दिवशी तीन चित्रपट पाहण्याइतका वेळ आणि पैसा सर्वसामान्य व्यक्तीकडे आहे का? कुटुंबाचा विचार केला तर सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कुटुंबाला तीन चित्रपट दाखवू शकत नाही. तसेच, तीन चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग सुद्धा विभागला जाणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. आणि एकाच दिवशी तीन चित्रपटांच टक्कर होते तेव्हा थिएटर आणि स्क्रीन्स यांचीही विभागणी होते. त्यामुळे एकही चित्रपटाला नीट व्यवसाय करता येत नाही. असं त्यांनी म्हंटल आहे”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)