“सूर्यवंशी’मध्ये अक्षय-जॅकलीन

चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांच्या आगामी “सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडिस यांची जोडी झळकणार आहे. या चित्रपटातील नायिका म्हणून प्रथम कतरिना कैफचे नाव चर्चेत होते. परंतु रोहित शेट्टीने ते फेटाळून लावले होते.

“सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस काम करणार असून तिच्या नावावर शिक्‍कामोर्तब करण्यात आला आहे. दरम्यान, चित्रपटात कतरिना कैफचे नाव चर्चेत होते. परंतु ती अफवा असल्याचे रोहित शेट्‌टी याने स्पष्ट केले.
रोहित शेट्‌टीचा “सूर्यवंशी’ हा चित्रपट “सिंघम’ सीरीजवर आधारित असणार आहे. यापूर्वी रणवीर सिंहचा प्रदर्शित झालेल्या “सिंबा’ चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट पुढील वर्षी ईदनिमित्त प्रदर्शित करण्यात येणार आहे.

दरम्यान, अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडिस यांची जोडी यापूर्वी “हाउसफुल’ आणि “ब्रदर्स’ या दोन चित्रपटात झळकली होती. अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी “केसरी’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. हा चित्रपट 21 मार्च रोजी “होळी’निमित्त प्रदर्शित होणार आहे. तर जॅकलनी फर्नांडिस ही सुशांत राजपूतसोबत “ड्राइव’ चित्रपटात काम करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)