अक्षय-अजयने मानले आभार

बॉलीवूडबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यात सिनेमांच्या तिकिटांवरील जीएसटी कमी करण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवीन दराची घोषणा करत सिनेमांच्या तिकिटांचे 1 जानेवारीपासून लागू होणारे नवीन जीएसटी दर जाहीर केले. या निर्णयाचे बॉलिवूडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले आहे. याबाबत अजय देवगण आणि अक्षय कुमार यांनी ट्‌वीट करत आभार मानले आहे.
अजय देवगणने ट्‌वीट केले की, “पंतप्रधान मोदी यांनी फिल्म इंडस्ट्रीने केलेली मागणी मान्य करत त्यावर त्वरित कारवाई केली आहे. याबद्‌दल त्यांचे धन्यवाद!’

अक्षय कुमारनेही पंतप्रधानांचे आभार मानत लिहिले की, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुलाखतीनंतर तातडीने निर्णय घेण्यात आला. सरकारने आमचे म्हणणे ऐकले आणि तिकिटांवरील जीएसटी दर कमी केले. यानिर्णयाचे चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांकडूनही स्वागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, प्रड्यूसर ऑफ इंडियन गिल्डचे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटसृष्टीतील प्रतिनिधी आणि अभिनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी चित्रपट जगतातील समस्या आणि इंडस्ट्रीमधील आर्थिक संकटाबाबत चर्चा केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)