अकोले तालुक्‍यात स्वाईन फ्लूचा तिसरा बळी

अकोले – अकोले तालुक्‍यात स्वाईन फ्लूचा फैलाव झपाट्याने होत असून सोमवारी तालुक्‍यातील तांभोळ येथील युवकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. युवकाचा नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

त्यापूर्वी त्याने अकोले येथे दोन खासगी दवाखान्यात उपचार घेतले होते. मात्र त्याची प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर नाशिक येथे सिव्हील हॉस्पिटलमध्ये हरनामे यांना दाखल केले होते.त्यांनी स्वाईन फ्लूची लक्षणे सांगून रुग्ण उशिरा दाखल झाल्याने उपचाराबाबत अगतिकता व्यक्‍त केली. दरम्यान अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागास अद्याप प्राप्त झालेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांच्याशी संपर्क साधला असता नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना टॉमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्या आजारपणा बाबतचा पूर्व इतिहास व अन्य माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे पाठविलेली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाला की नाही हे स्पष्ट होईल. दरम्यान आरोग्य विभागामार्फत तालुक्‍यात प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या बैठका घेण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)