पोलीसपाटलांचा अकोले येथे गौरव

अकोले – उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व पोलीस निरीक्षक प्रमोद यांच्या पुढाकाराने 5 पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या हस्ते व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन पाच पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. तालुक्‍यातील खेडे गावातील रस्ता सुरक्षा, महिला सुरक्षा, दारूबंदी यासारखे उपक्रम राबवून आंदोलन, चालू घडामोडी, विविध धार्मिक सण, उत्सव, कायदा व सुव्यवस्था, शांतता याबाबत पोलीस विभागासोबत समन्वय ठेवून उल्लेखनीय कामगिरी बजावत पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव केला.

यावेळी धुमाळवाडीच्या पोलीस पाटील प्रणाली प्रशांत धुमाळ, गर्दनीचे संतोष नामदेव अभंग,पानसरवाडीचे शिवाजी तान्हाजी जोशी, देवठाणचे राधाकृष्ण भिकाजी जोरवर, ब्राम्हणवाडाचे शिवाजी मनाजी हांडे या पाचही पोलिस पाटलांस प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानपुर्वक गौरविण्यात आले.

या वेळी ऍड. के. डी धुमाळ, पंचायत समिती सभापती रंजना मेंगाळ, नगराध्यक्षा संगीता शेटे, अगस्ती विद्यालयाचे सचिव सतीश नाईकवाडी, नायब तहसीलदार जगदीश गाडे, बी. जी. भांगरे, पोलीस उपनिरीक्षक विजय काळे, प्रशांत धुमाळ, तुषार सूरपुरिया आदी उपस्थित होते.

बीड येथे तहसीलदार म्हणून आदर्श काम केल्याबद्धल पुरस्कार जाहीर झालेले व अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांचा पत्रकार प्रा. डी. के. वैद्य यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन करून तलाठी बाबासाहेब दातखिळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)