अकोल्याच्या पूर्व भागात पावसाची हजेरी

अकोले  – वसुबारासेच्या दिवशी वरुणराजाने हजेरी लावून सर्वांना धक्का दिला. खरीप पिकांच्या काळात दांडी मारणारा पाऊस किमान रब्बी पिकांना दिलासा देणार काय ? हा खरा प्रश्न आहे. मात्र या पावसाने शेतकरी वर्गाला आज हजेरी लावून आगामी काळातही आपण हजेरी लाऊ, असे आश्‍वासक चित्र निर्माण केले आहे.

सायंकाळी अचानक ढगांच्या गडगडात व विजांच्या कडकडाटात या आगंतुक पावसाने वळीवाच्या पावसाप्रमाणे हजेरी लावली. तालुक्‍याच्या पूर्व भागातील काही गावात पिके भरणी होईल, असा हा पाऊस पडला, तर काही ठिकाणी त्याने आपले तोंड दुसरीकडे वळवीत आपला खोडकरपणा सिद्ध केला. या आगंतूक पावसामुळे शेतकरी वर्गाची धांदल उडाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झाकपाक, लागवड व औषध फवारणीत अडकलेल्या शेतकरी वर्गाला आज ऐन वसुबारसेला पावसाने हजेरी लावून गोपूजनात रंगत आणली. या पावसाने ऊस तोडकामगारांची धावपळ उडवली. अचानक आलेल्या या पावसाने अजून निवारा शोधणाऱ्या या कामगारांना ऐन दिवाळीत हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. वीजपुरवठा खंडीत झाल्याने अनेकांनी महावितरणचा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)