मोदींच्या ट्‌विटला अखिलेश यांचे प्रत्युत्तर; राम मनोहर लोहीयांवरून जुंपले वाकयुद्ध

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षावर टीका करताना त्यांनी राम मनोहर लोहिया यांच्या तत्वांची विश्‍वासघात केला असल्याची टीका केली होती. हे लोक उद्या लोकांचाही विश्‍वासघात करतील असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना अखिलेश यादव यांनीही मोदी व भाजप वर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की त्यांना सध्या शिझोफोर्निया झाला आहे. मोदी आणि भाजपने आत्तापर्यंत महात्मा गांधी, भगतसिंह, सरदार पटेल, डॉ आंबेडकर आणि लोहीया यांची नावे घेऊन राजकारण केले पण त्यांची सारीच कृत्ये या नेत्यांच्या तत्वांच्या विरोधात होती अशी टीका अखिलेश यांनी त्यांच्यावर केली आहे.

मोदींच्या वक्तव्यांना प्रादेशिक नेत्यांकडूनही आता जोरदार प्रत्युत्तर तिथल्या तिथे दिले जात असल्याचे नवीनच वातावरण सध्या पहायला मिळत आहे. मोदींनी प्रथमच समाजवादी पक्षावर लोहियांचे नाव घेऊन टीका केली होती त्याला समाजवादी पक्षाकडून कसे प्रत्युत्तर मिळते याचे औत्सुक्‍य होते त्यानुसार स्वता अखिलेश यांनी मोदींना हे प्रत्युत्तर दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)