अखिलेश यादव यांच्या अडचणीत वाढ !

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव आणि त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांच्या अडचणी वाढणार आहेत. उत्पनापेक्षा अधिक मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. याप्रकरणी सीबीआयला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सुनावणी करेल.

राजकीय कार्यकर्ते विश्वनाथ चतुर्वेदी यांनी २००५ साली याप्रकरणी याचिका दाखल केली होती. यामध्ये मुलायम सिंह यादव, त्यांची पत्नी डिंपल यादव आणि त्यांचा मुलगा प्रतीक यादव यांच्याविरुद्ध सत्तेचा दुरुपयोग करून उत्पनापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा आरोप लावला आहे. याप्रकरणी २००७ साली सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला आरोपांमध्ये तथ्य आहे कि नाही हे तपासण्याचे निर्देश दिले. यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अखिलेश यादव यांच्या विरोधात लागला तर त्यांना निवडणुकीमध्ये मोठे नुकसान सहन करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)