मुलायम सिंहांच्या जागेवर अखिलेश निवडणूक लढवणार

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशातील आझमगड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. आझमगड मतदारसंघात मुलाय्म सिंह यादव हे विद्यमान खासदार आहेत. समाजवादी पार्टीने ट्विटरवर जाहीर केलेल्या उमेदवारांच्य पहिल्या यादीमध्ये केवळ दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये आझम खान आणि अखिलेश यादव या दोघांच्या नावांचा समावेश आहे.

आझम खान हे सध्या रामपूर विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत. लोकसभेसाठी ते रामपूरमधूनच उभे राहणार आहेत. तर आझमगडमधून अखिलेश यादव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुलायम सिंह यादव हे पुन्हा एकदा आझमगडमधून लोकसभेची निवडणूक लढवतील अही शक्‍यता वर्तवण्यत येत होती. मात्र अखिलेश यांच्या उमेदवारीमुळे ही चर्चा थांबली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता मुलायम सिंह यादव हे मैनपूरी मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी आणखी एक शक्‍यता निर्माण झाली आहे. याच मतदारसंघातून 2014 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र नंतर त्यांनी नंतर येथील खासदारकीचा राजीनामा दिला होता.

अखिलेश यादव कनौजमधून निवडणूक लढवतील अशीही चर्चा होती. पण आता ती चर्चाही थांबली आहे. कनौजमध्ये अखिलेश यांच्या पत्नी डिंपल या विद्यमान खासदार आहेत. डिंपल यांची उमेदवारी यापूर्वी 8 मार्चलाच जाहीर करण्यात आली आहे.

सपाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये अखिलेश यादव, रामगोपाल यादव, आझम खान, जया बच्चन, डिंपल यादव आणि तेजप्रताप यादव यांची नावे आहेत. मात्र मुलायम सिंह यांचे नाव नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)