अखिलेश म्हणतात आता भाजपमध्ये पळापळ

लखनौ: बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी यांच्यात निवडणूक समझोता झाल्यानंतर आता आपले राजकीय भवितव्य संपल्याची जाणिव झालेले भाजपचे कार्यकर्ते आणि वरीष्ठ पातळीवरील नेत्यांमध्येही पळापळ सुरू झाली असून त्यांनी आता आमच्याकडे येण्याची तयारी चालवली आहे असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले आहे.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणावर हताशा आणि निराशा दिसून येत असून हमारा बुथ हुआ चकनाचुर अशीच भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे असे त्यांनी एका ट्‌विटर संदेशात म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्‌विटर संदेशात कालच्या पत्रकार परिषदेचा फोटोही पुन्हा शेअर केला आहे त्यात स्वता अखिलेश यादव हे मायावती यांच्या समवेत पत्रकारांना संबोधित करताना दिसत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)