संमेलनस्थळी प्रेक्षकांचा लेखिका नयनतारा सहगल यांचा मुखवटा घालून निषेध

यवतमाळ : वादग्रस्त ठरलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज पासून प्रारंभ झाला आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा वैशाली येडे यांच्या हस्ते झाले.

यादरम्यान, कार्यक्रमाच्या दरम्यान नयनतारा सहगल यांचे मुखवटे घालून तसेच सहगल यांच्या भाषणांच्या प्रतींसह काही लोकांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला उपस्थिती लावली आणि ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या अनुपस्थितीचा निषेध व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पोलीस आणि आयोजकांकडून मुखवटे आणि भाषणांच्या प्रती जप्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)