आमच्यातले संबंध सहमतीचे अकबर यांची कबुली 

नवी दिल्ली – पल्लवी गोगोई नावाच्या अमेरिकेतील पत्रकार महिलेने एम जे अकबर यांनी आपल्यावर 23 वर्षांपुर्वी बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर या विषयी स्वता अकबर यांनी अप्रत्यक्ष रित्या जाहीर कबुली देताना आमच्यातील हे संबंध सहमतीचे होते असे म्हटले आहे.

एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की 1994 साली पल्लवी आणि आपल्यात संबंध निर्माण झाले. ते काही महिने टिकले पण त्या संबंधांमुळे माझ्या कौटुंबिक जीवनातही तणाव निर्माण झाला. त्यामुळे सहमतीने निर्माण झालेले हे संबंध नंतर वाईटपणातून संपुष्ठात आले असे त्यांनी म्हटले आहे. पल्लवी आणि माझ्या संबंधांचे अनेकजण साक्षीदार आहेत. तेही हे सांगतील की आपल्याशी निर्माण झालेल्या संबंधांमुळे ती तणावग्रस्त नव्हती किंवा त्यातून तिला कधीच त्रास झालेला नाही असेही अकबर यांनी म्हटले आहे.

दरम्यान त्यांच्या वकिलांनी मात्र अकबर यांच्यावर या महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले असले तरी स्वता अकबर यांनी मात्र हे सहमतीचे संबंध होते असे विधान केल्याने त्याविषयी आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. पल्लवीशी असलेल्या संबंधावरून आपल्या पतीशी आपली नेहमी भांडणे होत अशी कबुली अकबर यांच्या पत्नी मल्लिका अकबर यांनीही दिली आहे. तथापि पल्लवी सह अकबर यांच्या कार्यालयातील पल्लवीची मैत्रीण तुशीता पटेल ही सुद्धा आमच्या घरी नियमीतपणे येऊन मेजवान्या आणि दारूपानही करीत असे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी पल्लवीवर जबदस्ती होत असल्याचे कोणतेही लक्षण आपल्याला त्यावेळी दिसले नाही पण ती आता का खोटे बोलत आहे असे अकबर यांच्या पत्नीचा सवाल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)