अकाली दलाच्या आमदाराकडून शाहरुखविरोधात फौजदारी खटला

चंदिगढ – अकाली दलाच्या एका आमदाराने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा “झिरो’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमामध्ये शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अकाली दलाच्या एका आमदाराने शाहरुख खानसह सिनेमासंबंधी इतर लोकांवर पंजाबमधील सिरसा येथे हा खटला दाखल केला आहे.

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त “झिरो’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. आधी चित्रपटातल्या शाहरुखची लुकची चर्चादेखील झाली होती. या चित्रपटातला एक पोस्टर रिलीज झाला असून या पोस्टरमध्ये शाहरुखने कृपाण परिधान केलेले दिसत आहे. त्यामुळे शीख बांधवांनी याला आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख खानने नोटांचा हार घातला असून गळ्यात कृपाण घातलेला दिसत आहे. हा फोटो मजेशीरपणे दाखवण्यात आल्याने शीख बांधव नाराज आहेत. शीख समाजावर उपहासात्मक कोटी करण्यात आल्याचा पंजाबमधील अकाली दलाचे आमदार मंजिंदर सिंग यांचा आरोप आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल या सिनेमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंग यांनी सिरसा येथील कोर्टात शाहरुख खान आणि इतरांवर फौजदारी खटला दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)