अजोय मेहतांनी स्वीकारला मुख्य सचिवपदाचा कार्यभार

मुंबई – मुंबई महापालिकेचे नवनियुक्‍त आयुक्त प्रविण परदेशी यांनी अजोय मेहता यांच्याकडून महापालिका आयुक्तपदाचा पदभार आज स्वीकारला आहे. तर अजोय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याआधी प्रविण परदेशी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते.

प्रशासन-सत्ताधारी-मुंबईकर हा संवादाचा पूल अधिक मजबूत करणार असल्याचे प्रविण परदेशी यांनी म्हटले आहे. पावसाळ्यातील आव्हाने समोर आहेत. मुंबईतील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी विशेष लक्ष देणार तसेच नालेसफाईची कामे त्वरित मार्गी लावणार आहे. मुंबईकरांचा यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार, असल्याची पहिल्या प्रतिक्रिया प्रविण परदेशी यांनी दिली आहे.

कोस्टल रोडसंदर्भातली कोळी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये ज्याठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे, त्या देशांतही कोस्टल रोडसारखे प्रोजेक्‍ट आहेत. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास परदेशी यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)