अझलन शाह हॉकी स्पर्धा : प्रभावी कामगिरी करण्यास भारतीय संघ उत्सूक

इपोह (मलेशिया) – मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघ आता मलेशिया येथे रंगणाऱ्या अझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. गत वर्षी स्पर्धेतील खराब कामगिरीला मागे टाकून यंदाच्या वर्षी स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे लक्ष भारतीय हॉकी संघाने ठेवले आहे. भारताचा पहिला सामना आज आशिया चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या जपानविरुद्ध होणार आहे.

सलामीच्या लढतीत भारताची खरी कसोटी लागणार असून आशियाई विजेत्या जपानशी भारताला लढत द्ययची आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघाचे मानांकन इतर संघांपेक्षा खूप वरचे आहे. त्यामुळे भारताला चांगला खेळ करावा लागणार. त्यातच अनेक वरिष्ट खेळाडूंच्या आणि प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत यंदा भारतीय संघ इपोह येथे दाखल झालेला असून यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे.

या वेळी मनप्रीत म्हणाला की, इपोहसारख्या उष्ण आणि दमट हवामानात खेळण्यासाठी भारतीय संघाने विशेष तयारी केली आहे. बेंगळूरुमध्ये आम्ही सराव शिबिरे आयोजित केली होती. या स्पर्धेत चांगली सुरुवात करून आम्ही भुवनेश्वर येथे होणाऱ्या एफआयएच सीरिज फायनल्स स्पर्धेची तयारी करणार आहोत. शिबिरात आम्ही कसून मेहनत घेतली आहे.

सलामीच्या लढतीतच आम्ही आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा असून सांघिक कामगिरीवर आमचा भर राहील,” असेही मनप्रीतने या वेळी नमूद केले आहे. भारतीय संघाचा दुसरा सामना 24 मार्च रोजी कोरियाशी तर आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाशी 26 मार्च रोजी भारताला लढत द्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)