अजितदादांच्या दौऱ्यामुळे दुष्काळी जनतेस दिलासा मिळेल : प्रभाकर देशमुख

File photo

वडूज – राष्ट्रवादीचे विधी मंडळ गटनेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढील आठवड्यात माण तालुक्‍याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे दुष्काळी खटाव माण तालुक्‍यातील जनतेस दिलासा मिळेल, असे मत कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.  वडूज येथे पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, नंदकुमार मोरे, संदिप मांडवे, ऍड. विलासराव इंगळे, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब जाधव, राजेंद्र कचरे, विजय खाडे, दादासाहेब मडके यांची प्रमुख उपस्थित होती. देशमुख म्हणाले, दि. 11 रोजी आ. अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वाघमोडेवाडी, ता. माण येथे जाहीर मेळावा होणार आहे.

कार्यक्रमाच्या पूर्वी आ. अजितदादा पवार व इतर नेते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी व दुष्काळी परिस्थीतीचे अवलोकन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे आपल्या व्यथा शासन दरबारी मांडल्या जाण्यास मदत होणार आहे. तरी तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
बैठकीस माजी उपसभापती प्रा. एस. पी. देशमुख, धर्माजी मांडवे, तानाजी बागल, प्रताप जाधव, श्रीकांत काळे, हणमंत खुडे आदी उपस्थित होते. संदिप मांडवे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)