सरकारनं आता शेतकऱ्यांसोबतच बेरोजगारांच्या आत्महत्येची यादी बनवायला घ्यावी-अजित पवार

पुणे – बेरोजगारीच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारविरूध्द चांगलीच आक्रमक होताना दिसत आहे. तसेच सध्याच्या सरकारला या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरात बेरोजगारीविरोधात आंदोलन छेडण्यात येत आहे, त्याचबरोबरच सोशल माध्यमाव्दारेही सरकारवर टीका करण्यात येत आहे.

माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सुध्दा सरकारवर टीका केली आहे. आज, सुशिक्षित तरुण वर्ग चहाची टपरी टाकत आहे. केळी विकत आहे. हे भाजप राज्य आणि केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेले २ कोटी रोजगार ? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. तसेच देशाला प्रकाशमान करणाऱ्या तरुण पिढीचं भविष्य अंधारात ढकलणारं हे सरकार आहे. प्रगतीची वाट चुकवून देश कुठे नेत आहे, हे सरकार? असं म्हणत अजित पवार यांनी टीका केली आहे.

 

तसेच ट्विटरवर अजित पवार यांनी ‘एका तरूणांन नोकरी नसल्यानं आत्महत्या केली’ या एका वृत्तवाहिनीने शेअर केलेल्या बातमीला अनुसरून  सरकारवर टीका केली आहे.

 

“सरकारनं आता शेतकऱ्यांसोबतच बेरोजगारांच्या आत्महत्येची ही यादी बनवायला घ्यावी. रोजगाराअभावी पदवीधर तरुणाची आत्महत्या, हा भाजपच्या खोट्या आश्वासनांमुळे गेलेला बळी आहे. २ कोटी रोजगार हवेत विरले. अशा पद्धतीनं हे  देशाचं भविष्य नष्ट करायला निघाले आहेत, अशा परखड शब्दात अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)