बारामतीतला पवार-काकडे वाद संपला? 

सोमेश्‍वरनगरच्या कार्यक्रमात केली एकमेकांची स्तुती 
 
सोमेश्‍वरनगर: काकडे-पवार घराण्यांचे राजकीय वैमनस्य 1967 पासून जिल्ह्याला परीचित आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवत काकडे महाविद्यालयात येवून अजित पवार यांनी राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे सोमेश्‍वरनगरच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून दाखवून दिले. तसेच याचा सगळ्यात जास्त अनुभव मला आणि शहाजी काकडे यांना असल्याचा उपरोधीक टोलाही आमदार अजित पवार यांनी लगावला.

पुणे जिल्ह्याला पवार आणि काकडे यांच्यातील कट्टर विरोध सर्वश्रुत आहे. जिल्हा बॅंक, जिल्हा परिषद व कारखाना निवडणुकांमध्ये तो पहायला मिळतो. परंतु, अलिकडे काकडे गटाचे प्रमुख सतीश काकडे यांच्यातील व अजित पवार यांच्यातील दुरावा विकासकामांमुळे कमी होत आहे.

सोमश्‍वरनगर येथील कार्यक्रमात सतीश काकडे यांनी पवार यांचे आभार मानून अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनून हेलीकॉप्टरने यावे आणि मला त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थना केली. तसेच जो चांगले काम करतो त्याच्यामागे मी असतो. अजित पवार यांचे काम काम चांगले आहे, यात शंका नाही, अशी पुस्तीही काकडे यांनी जोडली. तर, सतीशराव, राजकीय जोडे बाजूला ठेवून सामान्य माणसांसाठी काम करू, असे सांगत काकडे यांच्याशी सूर जूळल्याचे संकेतही या कार्यक्रातून अजित पवार यांनी दिले असल्याचे मानले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
563 :thumbsup:
673 :heart:
12 :joy:
24 :heart_eyes:
73 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)