अजय जयराम, ऋतुपर्णा यांची विजयी सलामी

हो चि मिन्ह: अजय जयराम आणि ऋतुपर्णा दास या अव्वल भारतीय खेळाडूंनी व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र सिरिल वर्मा, रसिका राजे, मुग्धा आग्रे व वैदेही चौधरी या भारतीयांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

अजय जयरामने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत ली ड्युक फॅटचा 21-19, 21-12 असा पराभव केला, तर दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या पिलियांग फिकिहिलाचे आव्हान 21-6, 21-17 असे सरळ गेममध्ये मोडून काढले. तिसऱ्या फेरीत त्याच्यासमोर ब्राझिलच्या अग्रमानांकित वायगोर कोएल्होचे आव्हान आहे. कोएल्होने भारताच्या सिरिल वर्माचा कडवा प्रतिकार 22-20, 17-21, 21-17 असा मोडून काढताना विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत ऋतुपर्णा दासने जपानच्या शिओरी सैतोचा 21-13, 21-14 असा 27 मिनिटांत पराभव केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिला एकेरीतील अन्य लढतीत रसिका राजेला मलेशियाच्या येन मेई हो हिच्याकडून 16-21, 13-21 असा 34 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. तर मुग्धा आग्रेला सातव्या मानांकित हॅन युएविरुद्ध 13-21,1 2-21 असा 27 मिनिटांत पराभव स्वीकारावा लागला. मलेशियाच्या क्रिस्टल पॅनने वैदेही चौधरीचा 21-14, 21-13 असा सहज पराभव केला.

मिश्र दुहेरीत शिवम शर्मा व पूर्विशा राम या सहाव्या मानांकित भारतीय जोडीला तादायुकी उराय व रेना मियाउरा या जपानी जोडीकडून 15-21, 16-21 असा पहिल्याच फेरीत धक्‍कादायक पराभव पत्करावा लागला. तर ध्रुव कपिला व जक्‍कमपुडी मेघना या जोडीला जियांग झेंगबॅंग व चेन यिंगझू या जोडीविरुद्ध कडव्या झुंजीनंतर 17-21, 21-18, 21-23 अशी हार पत्करावी लागली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)