“आरआरआर’मध्ये झळकणार अजय देवगण

बॉलीवूडमध्ये एस. एस. राजामौली यांच्या “बाहुबली’ या चित्रपटांला घवघवीय यश मिळाले होते. त्यानंतर आता राजामौली यांचा आगामी “आरआरआर’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटातील स्टारकास्टबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. यासाठी राजामौली यांनी हैद्राबाद येथे एका पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली.

यावेळी टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर देखील उपस्थित होते. या दरम्यान राजामौलींनी चित्रपटामध्ये राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री आलिया भट्टसह अभिनेता अजय देवगनही झळकणार असल्याची घोषणा केली.

-Ads-

अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर “आरआरआर’ चित्रपटात स्वातंत्र सैनिकांची भुमिका साकारणार असून आलिया भट्ट आणि अजय देवगन सहाय्यक कलाकार असणार आहेत. चित्रपटात महत्वाची भुमिका साकारण्यास अजय देवगनने होकार दिला आहे. या चित्रपटाचा भाग होण्यासाठी तो खूप उत्साहित असल्याचे राजामौली यांनी ट्विट केले आहे.

राजामौलींसोबत काम करणे म्हणजे माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छापूर्ण होण्यासारखे आहे. त्याच बरोबर राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर सहसुद्धा. मी दक्षिणात्य चित्रपटात पहिल्यांदा काम करणार असून मी त्यासाठी फार उत्साही असल्याचे आलिया भट्टने ट्विट केले आहे. आरआरआर हा चित्रपट तेलगू, तमिळ, हिंदी, मल्याळम आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये जुलै महिन्या प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)