अजय देवगण आणखी एका युद्धपटाचा नायक

बायोपिकच्या जमान्यामध्ये अजय देवगण भारत-पाक युद्धातील हवाई दलाचे विंग कमांडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ असे असून या चित्रपटाला 1971 साली झालेल्या भारत पाक युद्धाची पार्श्वभूमी असणार आहे. भारत पाकिस्तान युद्धावर यापूर्वी अनेक चित्रपट आले पण ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात युद्धातील हवाई दलाच्या योगदानाची पार्श्वभूमी असणार आहे. या चित्रपटात अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. कर्णिक हे भारत पाक युद्धादरम्यान हवाई दलाच्या भूज तळावर नियुक्त होते.

भूज तळावरील धावपट्टी युद्धादरम्यान पाकिस्तान हवाई दलाच्या हल्ल्‌यात उद्ध्‌वस्त झाली. कर्णिक यांनी त्यावेळी धाडसी निर्णय घेत आजूबाजूच्या गावातील महिलांकडे तळाची बांधणी करण्यासाठी मदत मागितली होती. त्यांनी 300 महिलांच्या मदतीने तळ पुन्हा बांधला होता. त्यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि हवाई दलाचे योगदान याची शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यंदाच्या वर्षी अजय देवगणचा तानाजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)