कन्या न्यासाला ट्रोल करणाऱ्यांवर अजय भडकला

बॉलिवूडमधील अनेक पालकांप्रमाणे अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल यांनीही आपल्या मुलांना स्पॉटलाईटपासून दूर ठेवत त्यांना नॉर्मल लाईफ देण्याचा प्रयत्न करत असतात. आता मुले थोडी मोठीही झाली आहेत आणि इंटरनेटवर लोक त्यांना ट्रोलही करत असतात. त्यांच्या ट्रोल होण्यावर अजयने भाष्य केले आहे. ‘जे लोक असं काम करतात त्यांचा माईंडसेटच घाणेरडा असतो. त्यामुळे अशा गोष्टींमुळे वैताग करून घेणेच मी सोडले आहे. इतकेच काय मी अशा गोष्टींकडे ध्यानच देत नाही. ही लोक नेहमीच आपला फेक आयडी वापरून असे उद्योग करत असतात.’ असे तो म्हणाला.

अजयचे वडील म्हणजेच वीरू देवगण यांचे निधन झाले होते तेव्हा न्यासा ट्रोल झाली होती. त्यांच्या निधनानंतर लगेच न्यासाचा पार्लरवाला फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. याआधीही आपल्या एअरपोर्ट लुकमुळेही न्यासा इंटरनेटवर ट्रोल झाली होती. न्यासा नेहमी तिची आई काजोल आणि वडिल अजय यांच्या सोबत दिसून येते. नुकताच न्यासाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या ड्रेसच्या आवडी निवडींवरूनही तिला ट्रोल केले जायचे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here