मुंबई – ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षे पूर्ण झाली. आपली मॅरेज ऍनिव्हर्सरी या दोघांनी मिळून मालदिवमध्ये साजरी केली आहे. त्यांच्या ऍनिव्हर्सरीचे काही फोटो ऐश्वर्याने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. त्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या आपली कन्या अराध्या दिसत नाही आहे. अराध्या फोटोंमध्ये न दिसण्याचे कारण म्हणजे हे सगळे फोटो स्वतः अराध्याने काढले आहेत. ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर ह्या फोटोंना शेअर करताना अराध्याच्या फोटोग्राफीचे कौतुकही केले आहे. अभिषेकनेही ट्विटरवर यापैकी काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये ऐश्वर्या एकटीच चांदण्यात बसलेली दिसते आहे. त्या फोटोला अभिषेकने कॅप्शन दिली आहे, “हनी ऍन्ड द मून’ अशी कॅप्शन देण्यामागचे कारण म्हणजे ऐश्वर्याच्या बरोबर मागे पौर्णिमेचा चंद्र दिसतो आहे. काही दिवसांपूर्वीच अभिषेक आणि ऐश्वर्या गोव्यामध्ये सुटी एन्जॉय करताना आढळले होते. गोव्यातल्या त्यांच्या एका फोटोवरून ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नंट असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र ही केवळ अफवा असल्याचे ऐश्वर्याच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले होते.
फोटो आहे.