विमान कंपन्यांकडून प्रवाशांना भरमसाठ सवलती

नवी दिल्ली – नव्या वर्षात विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. इंडिगो कंपनीने 899 रुपयांमध्ये विमान प्रवासाची ऑफर आणली आहे. न्यू इयर सेल अंतर्गत कंपनीकडून ही ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे.

देशांतर्गत विमान प्रवासासाठी केवळ 899 रुपयांपासून तिकीट दर ठेवण्यात आलेत, तर 3 हजार 399 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे तिकीट दर आहेत. याशिवाय मोबिक्विक ऍपद्वारे तिकीट बुक केल्यास अतिरिक्त 15 टक्के कॅशबॅकची ऑफरही आहे. 500 रुपयांपर्यंत या ऑफरची मर्यादा असेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यू इयर सेल अंतर्गत बुधवारपासून तिकीट बुकिंगला सुरुवात झाली असून 13 जानेवारीपर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे. 9 ते 13 जानेवारीदरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर 24 जानेवारी ते 15 एप्रिलपर्यंत प्रवास करता येईल. इंडिगोच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)