#AirStrike : पंतप्रधान मोदींना अजित डोवाल यांनी दिली माहिती; बैठक सुरु 

नवी दिल्ली – भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. या कारवाईनंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने वायूसेनेच्या  १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यामध्ये जैश-ए-मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तसेच  बालाकोट, चाकोथी आणि मुजफ्फरबाद लॉन्च पॅड पूर्णपणे नष्ट झाले. तर या हल्ल्यात जवळपास २००-३०० दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)