#AirStrike : ऑस्ट्रेलियाकडून पाकिस्तानची कानउघाडणी ! दोन्ही देशांना शांततेचा सल्ला

ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मेरिस पेने यांनी आज भारतीय वायुसेनेमार्फत पाकव्याप्त काश्मिरात करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मेरिस पेने यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पाकिस्तानचे दहशतवादाच्या मुद्द्यावरून चांगलेच कान उपटले आहेत. त्या म्हणाल्या, “14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान  यांच्यातील संबंधांविषयी ऑस्ट्रेलियन सरकारला चिंता आहे. भारतीय राखीव सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याबाबत ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच खेद व्यक्त केला आहे.”

याबाबत आपल्या वक्तव्यामध्ये त्या पुढे म्हणतात, “भारताच्या परराष्ट्र सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानमध्ये दहशतवादी गटांवर कारवाई करण्याचे पक्के केले आहे. पाकिस्तानने त्याच्या क्षेत्रामध्ये दहशतवादी गटांविरुद्ध त्वरित आणि अर्थपूर्ण कारवाई केली पाहिजे. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारे जैश-ए-मोहम्मद तथा लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातून सक्रिय असणाऱ्या संघटनांना पाकिस्तानने संपवले पाहिजे. पाकिस्तानने आपल्या भूमीमध्ये असणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रश्न मार्गी लावल्यास भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारून शांतता प्रस्थापित होईल.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

https://twitter.com/ANI/status/1100359945533313024

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)