#AirStrike: मेरा वचन है भारत माँ तेरा शीष नहीं झुकने दूंगा। : पंतप्रधान नरेंद्र मोदी   

राजस्थान – भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानातील चुरु येथे एक पूर्वनियोजित जाहीर सभा होणार असल्याने पंतप्रधान आपल्या भाषणातून हवाई दलाने दहशतवाद्यांचा केलेल्या नायनाटाबद्दल काय बोलतात याबाबत सर्वांनाच कमालीचे औत्सुक्य लागून राहिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुरु येथे बोलताना २०१४ साली त्यांनी भारत मातेला दिलेल्या वचनाची देशाला पुन्हा एकदा आठवण करून देताना म्हणाले की, “सौगंध मुजे है मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं रुकने दूंगा मैं देश नहीं झुकने दूंगा। मेरा वचन है भारत माँ को तेरा शीष नहीं झुकने दूंगा।”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)