#AirStrike : मोदींचा मजबूत आणि निर्णायक नेतृत्वाखाली भारत सुरक्षित -अमित शाह

नवी दिल्ली –  पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकवर कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा ट्विटरवरून भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम केला आहे. आणि ट्विट केले आहे कि, आजच्या कारवाईने पुन्हा हे सिद्ध केले आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत आणि निर्णायक नेतृत्वाखाली भारत सुरक्षित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)