#AirStrike : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांचा सरकारला पाठिंबा – सुषमा स्वराज

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय वायुदलाद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय दलांच्या बैठिकाबाबत माहिती दिली. आज पहाटे भारतीय वायुसेनेद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या प्रक्षिक्षण तळावर हवाई हल्ला करण्यात आला असून यामध्ये ३०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे.

सर्वपक्षीय बैठकीबाबत माहिती देताना स्वराज म्हणाल्या, “आज भारतीय वायुसेनेद्वारे पाकव्याप्त काश्मिरातील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या प्रक्षिक्षण तळावर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी मी  सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी वायुदलाने दाखवलेल्या पराक्रमाबाबत त्यांचे तोंडभरून कौतुक केले तसेच दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये पक्षभेद टाळून आम्ही सर्व जण सरकारसोबत आहोत अशी ग्वाही दिली.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100386537878011904

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)