गाझा – इस्रायलने गाझा पट्टीत एयर स्ट्राईक केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने गाझा पट्टीतील 100 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. जेट आणि हेलिकॉप्टर्सच्या साह्याने इस्रायली लष्कराने हमासशी संबंधित सुमारे 100 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुऴे इस्रायल-पॅलेस्टॅनियन संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
इस्रायलने केलेली ही कारवाई म्हणजे तेल अवीव क्षेत्रावर करण्यात आलेल्या दोन रॉकेट लॉचर्स डागण्याच्या कारवाईचे प्रत्युत्तर असल्याचे लष्कराने सांगितले आहे. अशा प्रकारचे रॉकेट हल्ले गाजावर नियंत्रण करणारा इस्लामी समूह करत नाही. ते कट्टरपंथीयांच्या गटाने केले असावेत, तेल अवीववर झालेल्या हल्ल्याला हमास जबाबदार असल्याचे इस्रायलचे संरक्षण मंत्री नॅफ्टली बेनेट यांनी म्हटले आहे. इस्रायलने केलेल्या जबाबी हल्ल्यात हमासच्या सुरक्षा दलांच्या चार इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र या हल्ल्यात कोणीही ठार झाल्याचे वृत्त नाही. हवाई हल्ला केलेली ठिकाणे गाझा शहरापासून सुमारे 25 किमी अंतरावर आहेत.