एअर स्ट्राईकमध्ये मसूद अझहरच्या मेहुण्याचा खात्मा? 

file photo

नवी दिल्ली  – भारतीय हवाई दलातील “मिराज 2000′ या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाक व्याप्त काश्‍मिरच्या हद्दीत घुसून केलेल्या हल्ल्‌यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचा खात्मा झाल्याचे समजते. युसूफचा खात्मा हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी मोठा हादरा मानला जात असून युसूफ हा भारतातील “मोस्ट वॉंटेड’ दहशतवाद्यांपैकी एक होता. त्यामुळे हा हदरा थेट मसूद अझहरलाच बसला आहे. भारताच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावरील 200 ते 300 दहशतवादी आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा खात्मा केल्याचे वृत्त आहे.

यामध्ये अफगाणिस्तान व काश्‍मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्‍मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-814 विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ आणि या तळावरील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या युसूफ अझहर याचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. बालाकोट येथील डोंगराळ भागातील घनदाट जंगलात भारतीस हवाई दलाने हल्ला केला. हे तळ निवासी भागापासून लांब होते, तसेच युसुफ अझहरला लक्ष्य करण्यासाठीच हा हल्ला केला गेल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)