…त्यामुळे पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे गरजेचे – सुषमा स्वराज 

नवी दिल्ली – भारतीय वायुसेनेने मंगळवारी पाकिस्तानची सीमारेषा ओलांडत दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज चीनच्या दौऱ्यावर आहेत. रशिया, भारत आणि चीन (आरआयसी) या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या आहेत. या बैठकीत त्यांनी भारताने एअर स्ट्राइक करण्यामागचे कारण स्पष्ट केले.

सुषमा स्वराज म्हणाल्या कि, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यानंतर संपूर्ण जग पाकिस्तानला जैश आणि इतर दहशतवादी संघटनांनाविरोधात कारवाई करण्यास सांगत होते. परंतु, दहशतवाद्यांबाबत पाकिस्तान कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने आम्हाला हल्ला करावा लागला. तसेच दहशतवादी भारतात आणखी हल्ला करण्याचा कट रचत होते. त्यामुळे ही कारवाई करणे गरजेचे होते. ही कारवाई करताना भारताने संपूर्ण काळजी घेतली असून यावेळी निश्चित केलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच निशाणा साधला. ही कारवाई संपूर्णपणे दहशतवाद्यांविरोधात होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100586687749648391

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)