हवाई दलाच्या जेट विमानांची बेंगळूरू येथे सरावादरम्यान टक्कर

बेंगळुरू (कर्नाटक) – हवाई दलाच्या दोन सूर्यकिरण हॉक जेट विमानांची बेंगळूरू येथे सरावादरम्यान हवेत टक्कर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बेंगळुरू येथे दर दोन वर्षांनी होणाऱ्या एरो इंडिया शो’साठी सराव करत असताना सोमवारी ही दुर्घटना घडली. दोन्ही विमानांत मिळून तीन पायलट होते.

एका विमानातील दोन पायलट सुखरूप बाहेर पडले असले, तरी एका पायलटचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. बेंगळुरूच्या येलहंका हवाई अड्ड्यावरून या विमानांनी झेप घेतली होती. सूर्यकिरण ही हवाई दलाची जेट हॉक विमाने हवेत चित्तथरारक कसरती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभारी पोलीस महासंचालक (फायर अँड इमर्जन्सी) एम एन रेड्डी यांनी सूर्यकिरण जेट विमानांच्या दुर्घटनेच्या आणि एका पायलटचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हवेत टक्कर झाल्यानंतर विमानांनी पेट घेतला. विमानांचे अवशेष इस्रो कॉलनीच्या आसपास पडले असले, तरी तेथील घरांचे मोठेसे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेत कोणा नागरिकाला दुखापत झाली नसल्याचे वा कोणा नागरिकाचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट करून अग्निशमन दलाने आग त्वरित आटोक्‍यात आणल्याचे त्यांनी सांगितले. विमानाच्या दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडियो ट्‌विटरवर व्हायरल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)