एअर इंडियाचे पायलट असमाधानी

व्यवस्थापनाचा सुधारित वेतनाचा प्रस्ताव नाकारला

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने प्रस्तावित केलेले सुधारित वेतन स्वीकारण्यास बोइंग विमान चालविणाऱ्या पायलट्‌सनी नकार दिला आहे. या सुधारणेमुळे वेतन 25 टक्‍क्‍यांनी कमी होणार असल्याचा आरोप पायलटनी केला आहे.
रुंद बॉडी बोइंग विमान व अरुंद बॉडी विमान यांच्या पायलटांच्या वेतनात समानतेसाठी एअर इंडियाने वेतनात सुधारणेचा निर्णय घेतला. रुंद बॉडी पायलटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन पायलट गिल्डने (आयपीजी) यास विरोध करीत एअर इंडियाच्या व्यवस्थापनास नोटीस पाठविली आहे. कामगार आयुक्त दोन्ही पक्षांना बोलावून समेटाचा प्रयत्न करणार आहेत. आयपीजीचा एक पायलट म्हणाला की, हा निर्णय म्हणजे न्यायालयाचा
अवमान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2012 मध्ये सरकारच्या एका पॅनलने सर्व पायलटांच्या वेतनाची पुनर्रचना केली होती. त्यावर 2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिला होता. जून 2016 मध्ये अरुंद बॉडी विमानांच्या पायलटांनी नव्या वेतनाचा स्वीकार केला. रुंद बॉडी विमानांच्या पायलटांनी मात्र नव्या वेतनास नकार दिला. आपले वेतन 25 टक्‍क्‍यांनी कमी होईल, असे संघटनेने म्हटले होते.

त्यानंतर अरुंद बॉडी विमान पायलटांचे वेतन 2016 च्या करारानुसार दिले जात होते. रुंद बॉडी विमान पायलटांना मात्र जुनेच वेतन दिले जात होते. 2017 मध्ये आयपीजीने सुधारित वेतन संरचनेस मान्यता दिली. पण नागरी उड्डयन मंत्रालयाने नोव्हेंबर 2018 मध्ये ती फेटाळून लावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)