एअर इंडियाची दुभती गाय विक्रीला

File photo

नवी दिल्ली,सरकारचा एअर इंडियाचे भागभांडवल विकण्याचा प्रयत्न फसला आहे. आता सरकारने एअर इंडियाची कार्यक्षमता वाढवून आणि या कंपनीला नफ्यात आणून नंतर तिची शेअरबाजारावर नोंदणी करायचे ठरविले आहे. यासाठी कंपनीला पुरेसे खेळते भांडवल देण्याचे सरकारने ठरविले होते. मात्र, निधी उभारण्यासाठी एअर इंडियाची नरिमन पॉईंटवरील प्रख्यात 23 मजली इमारत विकण्याचे सरकारने ठरविले आहे. कर्मचाऱ्याचा विरोध असतानाही सरकार एअर इंडियाची ही इमारत जेएनपीटीला विकण्यासाठी प्रयत्न करत असून याला पंतप्रधान कार्यालयाकडून तत्वत: मंजुरी मिळाली आहे.

हा व्यवहार मार्गी लावण्यासाठी नागरी विमान वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्रालयातील सचिवाची समिती नेमण्यात येणार आहे. हा व्यवहार झाल्यानंतर या इमारतीचे नामांतर करण्यात येणार आहे. सध्या या इमारतीला एअर इंडिया बिल्डींग असे म्हटले जाते. ते नंतर जेएनपीटी करण्यात येणार आहे. जेएनपीटी भारतात सागरी मार्गाने येणाऱ्या 55 टक्‍के मालाची हाताळणी करते. त्यामुळे या कंपनीचा नफा 1300 कोटींपेक्षा जास्त आहे.
या अगोदरही एअर इंडियाच्या काही मालमत्ताची विक्री झाली आहे. या कंपनीवर 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या इमारतीच्या भाड्यातून कंपनीला चांगला महसूल मिळतो. त्यामुळे कर्मचाऱ्याचा या इमारतीच्या विक्रीला विरोध आहे. मात्र, सरकार तिकडे दुर्लक्ष करून हा व्यवहार करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाला नरिमन पॉईंटच्या 23 मजली इमारतीने आतापर्यंत मोठा आधार दिला. सध्या एअर इंडियाला कर्मचाऱ्यांचे पगार देतानाही नाकीनऊ आले आहेत. मात्र सरकारसाठी पांढरा हत्ती ठरत असलेल्या एअर इंडियाला नरिमन पॉईंटला असलेल्या 23 मजल्यांच्या पांढऱ्याशुभ्र इमारतीने तारले आहे.
नरिमन पॉईंटला एअर इंडियाच्या मालकीची 23 मजली इमारत आहे. एअर इंडिया टॉवरचे बरेचसे मजले विविध कंपन्यांच्या कार्यालयांना भाड्यानं देण्यात आले आहेत. त्यातून एअर इंडियाला वर्षाकाठी 100 कोटींचं उत्पन्न मिळते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केली जाते. एअर इंडियाने त्यांचे मुख्यालय हलवल्यानंतर नरिमन पॉईंटमधील इमारतीतील बरेचसे मजले भाडे तत्त्वावर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)