‘वायू’ चक्रीवादळ : 1 लाख 60 हजार लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

गुजरात सरकारने जारी केला हाय अलर्ट

अहमदाबाद –  ‘वायू’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर आज धडकणार आहे. तसेच आज वादळाचा वेग आणखीन वाढणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरात सरकारने हाय अलर्ट जाहीर केला असून किनारपट्टीवर एनडीआरएफ, नौदलाचे 50 पथके तैनात करण्यात आले आहेत. तर, 10 सेनादलाच्या तुकड्यांना देखील सज्ज राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नागरिकांना, मच्छिमारांना सतर्क राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. या परिसरातील स्थानिकांना 1 लाख 60 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज गुजरात किनारपट्टीवर पोरबंदर आणि महुवा दरम्यान “वायु’ चक्रीवादळ ताशी 135-145 किमी वेगाने धडकण्याची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांच्या सखल भागात 1 ते दीड किलोमीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. भागातील जवळपास 1 लाख 60 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याच बरोबर रेल्वे स्थानक आणि विमानतळ तात्पुरते बंद ठेवण्यात आल्याची माहिती देखील गुजरात सरकारच्या प्रवक्‍त्यआंनी दिली आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभुमीवर गुजरात मधील 10 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असुन लोकांना महत्वाच्या कामा व्यतिरीक्त घरा बाहेर पडू नका अशा सुचना देखील करण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)